Wbbf

/ Vivek Kale Nature Photography
 

 
 
 


चित्रनिबंध - श्वेतपोट्या निळा माशीमार / राननिळा
Photo essay : White Bellied Blue Flycatcher
May 2010
Please use minimum 1280 pixel horizontal screen resolution for viewing. Please be patient while all the images in webpage are loaded.
First 3 photographs presented below are mapped and are interactive. Please move the mouse pointer over the subject to understand more about the external anatomical features of the subject. Please do not use the images for any commercial use without permission. Text in Marathi and English is not exact translation.
 
पुण्याहून कोकणात जाताना, खंडाळा घाट लागतो. बालपणी याचे फार आकर्षण होते. तेथे अजब गोष्टी पहावयास मिळायच्या म्हणुन ! घाटात दिसणारे कातकरी, द्रोणातली करवंदे, रेल्वेमार्गावरचे बोगदे, बोगद्याबाहेरचे धबधबे, मंकीहिलची माकडे, घाटमार्गाच्या एका बाजुस असणारी खोल दरी, त्या खोलीला घाबरुन रेंगणारया गाड्या आणी बरेच काही. शाळेत बुकं शिकल्यावर कळालं ह्या डोंगररांगांना सह्याद्री म्हणतात. इंग्रजीत याला "वेस्टर्न घाट" असे म्हणतात. या रांगेतील बहुतांश डोंगर १० किमी रुंद उभ्या पट्टीत आहेत. पावसाळ्यात या डोंगरांत मेघ अवतरतात. येथील प्रत्येक पानाफुलाला, झाडाला, मातीला, जगावेगळे रुप मिळाले आहे. देशावरुन कोकणात उतरताना, आपल्याला येथील स्रुष्टी पहाण्यास मिळते. महाराष्ट्रात देशावरुन कोकणात उतरण्यास, अदमासे ९-१० गाडीमार्ग आहेत. ३० एक वर्षांपुर्वी पर्यंत गाडीमार्ग लहान होते. आता गाडीमार्ग मोठे झाले आहेत. अधिक्रुत जंगलतोड झाली. खंडाळ्याला झाडे कमी, बंगले जास्त झाले. दरीला घाबरणारी वाहने भरधाव झाली. ओरिजनल झाडे गेली, त्यांची जागा घेतली सरकारी साग, निलगिरीच्या झाडांनी आणी अमेरिकन स्ट्रॉबेरीच्या शेतांनी . गेल्या ७-८ वर्षात पुणॆ, सातारा जिल्ह्यात सगळ्याच घाटमाथ्यावरच्या गावांना लोणावळा खंडाळा होऊ वाटू लागल आहे. प्रत्येक तालुक्यात घाटमाथ्यावरुन कोकणात गाडीमार्ग असावा असा हट्ट आता उरल्या सुरल्या जंगलाची वाट लावणार हे नक्की झालं. घाटावरची माणसं, त्यांची वाहन, घर, अगदी त्यांची शेतं सुद्धा कोकणकड्यावर येउन ठेपली आहेत. अजुन हि बरयाच शहरी माणसांना येथील जंगलात वाघ आहेत असा खुळा समज आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे व शेतीकरणामुळे सह्याद्री वर ताण वाढत चालला आहे. मोजक्या भागात आता (२०१०), खरे वैविध्यपुर्ण सदाहरित जंगल, अखेरचा श्वास घेत आहे. या जंगलातील करवंदीच्या जाळ्यातील पट्टेरी वाघ, लूप्त झाले. राहिली ती फक्त करवंद. इतर बरेच प्राणी नष्ट झाले. काही छोटे जीव, थोड्या प्रमाणात तग धरुन आहेत. यात आहेत काही पक्षीगण. सह्याद्री रांगेत महाराष्ट्रात रहाणारे व पश्चिम घाटाबाहेर जगात कुठेही न आढळणारे असे १० जातीचे पक्षी आहेत. या दहा पैकी एक आहे, श्वेतपोट्या निळा माशीमार/राननिळा. हा पक्षी फक्त गर्द सदाहरित जंगलात आढळतो. दुर केरळ राज्यात सुद्धा हा पक्षी आढळतो. याला मल्याळम भाषेत नाव आहे, कट्टुनिली म्हणजे राननिळी. बाकी इकडे महाराष्ट्रात असा पक्षी असतो, याचा काही पक्षीमित्र सोडले तर इतरांना ठाव नाही. या पक्ष्याला साधे मराठीत नाव सुद्धा नसावे ? इंग्रजांनी थोडा अभ्यास केला मात्र एतद्देशीय मात्र वाळकेश्वराच्या बुटात अडकुन राहिला. असो.
 
As one travels from Mumbai to Pune, one has to travel though a steep hillroad called as Khandala ghat. In my childhood these hills were very interesting. The aborginals of these hills, their dialect, the strange fruits they used to sell, tunnels on the railroad, the waterfalls outside the tunnels, the deep gorges, spectacular precipitous cliffs, slow crawling vehicles and many more. Later in the school, I came to know that these hills are called as Sanhyadri, (western ghat). These hills of western ghats lie in a narrow verticle strip from Maharashtra to Kerala. In golden old days the forest was very beautiful and enchanting. Due to the rapid industrialisation and agricultural pressures, today the condition of the forest in Pune and Satara districts is rapidly detoriating. Most of the mammals and large trees from the Sahyadri forests are no more existing. Small number of birds and small organisms are still battling for their existance. Out of about 14 endemic birds of western ghats, about 10 species of endemic birds are seen in Maharashtra. The small bird called as white bellied blue flycatcher is one of these forest gems. The bird has no known common name in Marathi. The bird is called as Kattuneeli in Malyalam, which mean the blue bird from thick forest.
 
Cyornis pallipes, White bellied blue Flycatcher male, श्वेतपोट्या निळा माशीमार नर
 
White Bellied blue flycatcher, Cyornis pallipes is one of the few endemic birds of western ghats. In western ghat range in Maharashtra, about 10 of these endemic birds are seen. White bellied blue flycatcher, about 15 cm bird, is seen in the undergrowth of the evergreen forest patches, in western ghats, from Bhimashankar to South Kerala.
 
Cyornis pallipes, White bellied blue Flycatcher male, श्वेतपोट्या निळा माशीमार नर
 
पश्चिम घाटात रहाणारा, स्थलांतर न करणारा हा छोटा पक्षी थोडा शांत व बुजरा असल्याने सहजा माणसाच्या नजरेत येत नाही. घनदाट जंगलात तो एकटा फिरताना आढळतो. नर पक्षी रंगाने पेनातील निळयाशार शाई सारखा असतो. पोटाशी मात्र तो शुभ्र पांढरा असतो. पांढरा पक्षी उलटा धरुन निळ्या शाईच्या बाटलीत जणू बुचकाळल्यासारखा. डोळ्यांसमोरील भाग काळसर असतो.
 
The male bird is cobalt blue in color with white underbody. The bird is local resident bird. It is shy and sluggish bird. The similar looking bird called as Nilgiry flycatcher is resident of South Western ghats. The main difference between male Nilgiri and White bellied Blue flycatcher is the color of the underbody (abdomen) as the name suggests.
 
 
Cyornis pallipes, White bellied blue Flycatcher female, श्वेतपोट्या निळा माशीमार मादी
 
मादी पक्षी मात्र नरापेक्षा वेगळा दिसतो. मादीची शेपुट, छाती व पाठ तपकिरी असते. डोक्याकडे रंग निळसर करडा असतो. डोळ्यासमोरचा भाग पांढरा असतो. प्रथमदर्शिनी हा पक्षी तांबुल नर पक्ष्यासारखा भासतो.
 
Female bird looks completely different than the male bird and is often mistaken as male red breasted flycatcher. Female has orange breast, chestnut colored tail. The head is bluish grey, the back is chestnut grey. The underbody however is white like in case of male bird. The eyes are brown black.
 
Cyornis pallipes, White bellied blue Flycatcher female, श्वेतपोट्या निळा माशीमार मादी
 
पाणवठ्यावर हा पक्षी इतर माशीमार/नाचरे जातीच्या पाखरांप्रमाणे हमखास आढळतो. पाण्याकिनारील दगडातील माश्या खाण्यासाठी व उन्हाळ्यात गार वहात्या पाण्यात अंघोळ करण्यास मादी येते.
 
The bird particularly female visits the waterpuddles for hunting the insects around the rocks. The bird often visits the waterholes in summer for the bath in cold water.
 
 
Cyornis pallipes, White bellied blue Flycatcher female, श्वेतपोट्या निळा माशीमार मादी
 
घनदाट जंगलातील हा पक्षी, जंगलाच्या बाहेर, विरळ झाडीत आढळत नाही. याचे अस्तित्व घनदाट जंगलावर विसंबुन आहे. या पक्ष्याला थेट धोका नसला तरी, जंगलाचा होणारा नाश, या जातीच्या पक्ष्यांसाठी असलेले एक संकटच आहे. कावळा, चिमणी, पोपट, साळुंकी, बदक, बगळा, घार व मोर याच्या पलिकडे पक्षी माहित नसलेल्या शहरी माणसांपासून या सदाहरित वनांचे व त्यातील प्राणीपक्ष्यांचे रक्षण करणे हा काही जणांसाठी गंभीर प्रश्न तर काही जणांसाठी चेष्टेचा मुद्दा झाला आहे.
 
As this bird is hardly seen outside the narrow patches of evergreen forests, the bird is indirectly under threat due to rapid depletion of the narrow patches due to rampant industrialisation, agricultural activities around the western ghats. Every year number of patches are converted from evergreen forests in to the paddy fields. The new trend of Urbanisation of the north western ghats may prove a big trouble for such forest species.
 

 

Cyornis pallipes, White bellied blue Flycatcher female, श्वेतपोट्या निळा माशीमार मादी
 
हे पक्षी डोंगररानात, कड्यावर, दगडाच्या खाचेत, झाडातल्या बिळात चार अंडी घालतात.
 
Cyornis pallipes, White bellied blue Flycatcher female, श्वेतपोट्या निळा माशीमार मादी
 
या पक्ष्याचे गाणे गोड पण नैराश्यिक असते, असे स्टुअर्ट बेकर यांनी नमूद केले आहे. हा पक्षी फ़ेब्रुवारी ते सप्टेंबर या काळात अंडी घालतो.
The song of this bird can be heard early morning or late evening. The song is sweat but full of melancholy. Though the bird is common is dense forest of western ghats. Very little is known about habits of this bird.
 
Cyornis pallipes, White bellied blue Flycatcher female, श्वेतपोट्या निळा माशीमार मादी
 
सह्याद्रीच्या घनदाट जंगलाचा हा एक प्रतिनिधी आहे. या जंगलाशी याचे असलेले अतुट नाते, विस्मयकारक आहे. कर्नाटक व केरळ राज्यात या पक्ष्याची संख्या जास्त आहे कारण तेथे पश्चिम घाटात, जंगल टिकुन आहे. महाराष्ट्रात मात्र सह्याद्रीतले घनदाट जंगल आटत चालले आहे. आपण सर्व या बेचक्या बेचक्यात उरलेल्या वेचक्या रानाची व त्यातील उरलेल्या अनमोल संपत्तीची काळजी घेणे महत्वाचे आहे.
This bird is a true icon of western ghats. The attachment of this bird with the dense forest, makes it more special. Western ghats is one of the important hotspots of biodiversity. Let us preserve it !
 
References : My notes, Pocket guide to the Birds of the Indian subcontinent by Grimemtt-Inskipp-Inskipp, wikipedia, Birds of Asia by Rasmussen-Anderton and the Field books of Indian birds by Stuart Baker.


Contact me at kale_v@rediffmail.com for any queries and suggestions and email subscription.